मनाचे आरोग्य -1 Minds Health – 1

Spread the love

मनाचे आरोग्य minds health

मानवी जीवनात दुःख हे वर्तमानात असते आणि शोकहा भूतकाळचा असतो चिंता ही भविष्या करता असते.

वर्तमान कायम राहत नाही
भूतकाळ घडून आपण सोसून संपवलेला असतो
सुदृढ शरीर जसे हवे तसेच सुदृढ मन सुद्धा हवे च
शरीर सुदृढ असेल पण मन सुदृढ असेलच असे नाही

सुदृढ शरीर जसे हवे तसेच सुदृढ मन सुद्धा हवे च
शरीर सुदृढ असेल पण मन सुदृढ असेलच असे नाही
पण जर सुदृढ असेल तर शरीर सुद्धा प्रफुल्लित आणि टवटवीत राहील आरोग्यदायी असेल.
दणकट असणारे शरीर सुद्धा ऐनवेळी कच खाऊ शकते.
पण मनाने भक्कम असणारे असणारे हे शरीर दणकट नसले तरीसुद्धा कुठल्याही परिस्थितीत खंबीर राहू शकतात, कारण त्यांचं मन हे दणकट आहे खंबीर आहे आणि कुठल्याही परिस्थितीचा ते व्यवस्थित सामना करू शकते.

मनाचे आरोग्य Minds Health

या लेखात आपण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या एका विषयाबद्दल जाणून घेऊ, आपल्या शरीराला मानसिक आणि शारीरिक हे दोन प्रकारचे आजार होतात. आजकाल माणसाला होणारे बहुतेक आजार हे मानसिकच आहेत असा अनुभव वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शरीराला झालेले विकार, दुखापत आपण बाह्य औषधांनी नीट करू शकतो. परंतु मनाला आलेली मरगळ, ग्लानी , विकार याच्यासाठी असे कुठले प्रकारचे औषध वैद्य देऊ शकत नाही, कारण मनाचे विकार हे मानसिक अवस्था असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची ती एक प्रतिमा असते.त्यामुळे मनासाठी लागणारे औषध सुद्धा हे आपल्या आताच असते आणि ते आपल्याला स्वतःच शोधायचे असते.


मनासाठी लागणारे उत्तम औषध हे ज्याच्या त्याच्याकडेच असते, त्याचे उपाय हा तोच करू शकतो परंतु कधीकधी योग्य विचार न केल्याने अति घाईने अति विचाराने आपण चुकीचे निर्णय घेतो.
भास होणे, सतत भीती वाटते, छातीत धडधडणे, झोप न येणे, हे मनाचे विकार आहेत. त्यासाठी आपण वरवरचे औषध घेतो आणि ह्या औषधांनी बरे वाटेल म्हणून ती घेतच असतो पण याने ते विकार बरे होण्याची शक्यता नसते, पण मात्र या औषधांच्या आपल्याला सवय लागते.

मनाची दुर्बलता वाढत जाते तेव्हा मनुष्य विचाराने ग्रासलेला असतो अति विचारत कुठल्याही टोकाचा निर्णय घेतो त्यात तो स्वतःच्या जीवाचा बरवाईट करण्याचा विचार करतो आत्महत्याचा प्रयत्न करतो, आणि ह्याच कारणामुळे समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेला आहे या वाढत्या प्रमाणाकडे आपल्याला मानसिक आरोग्याच्या दृष्टीने बघायची गरज आहे.
त्यासाठी आपलं मन हे सतत एखाद्या चांगल्या कामात व्यस्त ठेवणे. मनातील गोष्टी खदखद अडचणी आपल्या जवळच्या व्यक्तींकडे सांगणे, मित्र -मैत्रिणी, पती- बायको, ज्येष्ठ व्यक्ती यापैकी कोणाकडे आपले मनमोकळे करावे.

मनाचे आरोग्य Minds health
मनाचे आरोग्य Minds health


त्यामुळे मनावर झालेला आघात दुर्बलता हे काही प्रमाणात दूर होईल आणि आपल्याला जगण्यासाठी नवी उमेद मिळू शकते.
यासाठी आपण ध्यान योग अशाही साधनांचा अवलंब करू शकतो याने आपले मनाचे आरोग्य Minds health सुदृढ होईल मनाला आलेली मरगळ दूर होईल.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. प्रत्येक माणूस नात्यांच्या गोतावळ्यात मित्र-मैत्रिणींना असतो. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती त्यामुळे असे एकलकोंडेपणा मनाची आणि दुर्बलता हे सहसा होत नसेल, कुटुंब अशा व्यक्तीची योग्य ती काळजी घेत असे परंतु पुढे हळूहळू कुटुंबाचा आकार कमी झाला चौकोनी नंतर त्रिकोणी असे कुटुंब संस्था वाढीस लागली .

करिअरच्या मागे धावत असताना दमछाक होते आणि यामुळे सुख दुख वाटायची कोणाबरोबर असा प्रश्न असतो, नोकरी व्यवसाय करत असताना तिथे कामाचा व्याप आणि सहाजिक आहे त्याचा ताण प्रत्येकावर असतो त्यामुळे आयुष्यात घडणारे इतर गोष्टींकडे थोडसं दुर्लक्ष करतात आणि यामुळेच मनाचं ओझ वाढत मन दुर्बल होते.
आणि आणि यामुळेच मानसिक आजार बळावण्याची शक्यता वाढत चालते.


शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी औषध आहेत आणि डॉक्टर आहेत हे त्या विकार दूर करू शकतात परंतु मानसिक दुर्बलता मानसिक विकास साठी काय लागेल याचा कधी विचार केला ?नाही ना? मनाच्या दुर्बलतेसाठी खरी गरज ही माणसांचीच आहे आपल्या मनाला आलेली दुर्बलता आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून बोलून आपल्या मनातल सांगूनच दूर करू शकतो यामुळे मन हलकं झाल्यासारखं वाटेल आणि आत्मिक समाधान लाभेल मनाच्या दुर्बलतेमुळे येणारे अतिविचार आणि यामुळे मन काहीतरी चुकीचा निर्णय घेण्यापासून परावृत्त होईल.

भले आज माणसाने किती ही प्रगती केली असली तरी जेव्हा वैद्यकीय क्षेत्राला एखाद्या आजाराचे निदान करता येत नाही तेव्हा त्या आजारास एक मानसिक आजार आहे असे समजले जाते
, मानसोपचार , योगोपचार, संमोहन, निसर्गोपचार, हिप्नोटिझम, ब्रह्मविद्या, विपश्यना, रेकी, असे सगळेच मनाची मानसिकता बदलणारे उपचारसुद्धा वेगाने पुढे येत आहेत.

मनाचे आरोग्य Minds health कसे राखावे

1 मनातल्या मनात आकडे मोजावे आणि कालांतराने हेच आकडे मागून मोजण्यास सुरुवात करावी.
2 आपल्या आवडीनुसार संगीत ऐकणे.
3 आवडीचे पुस्तक, लेख, कविता वाचणे.
4 कार्यालयातील संगणकाशेजारी एखादे छोटे रोपटे ठेवणे किंवा संगणकाशेजारी कुटुंबाचे छायाचित्र ठेवणे
5 घरातील पाळीव प्राणी हे अनेकांचा ताण घालवणारे उत्तम मित्र असतात. त्यांच्याशी खेळणे यामुळे ताण कमी होइल.
6 आजूबाजूचे वातावरण प्रसन्न अणि सुगंधी ठेवणे.
7 तणावाच्या प्रसंगी आपल्या मनात येणाऱ्या भावना लिहून काढा. आपल्याला कळेल कोणत्या गोष्टीचा ताण आलाय किंवा राग आलाय.

8 नामस्मरण करणे. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. याने मन प्रसन्न आणि प्रफुल्लित रहील.
9 मित्रांशी चर्चा करणे. केवळ बोलूनही ताण निवळतो.
11 शक्य असल्यास चालण्यासाठी बाहेर पडणे.
12 विनोदी चित्रपट पाहणे.
13 दीर्घ श्वास घेणे , योगासने करणे, श्वासावर लक्ष देणे, असे साधे प्रकारही मन:शांती वाढवतात.


Spread the love

1 thought on “मनाचे आरोग्य -1 Minds Health – 1”

  1. Pingback: पर्यावरणास जपण्याचे 12 सोप्पे उपाय Parayvaran Japnyache 12 upay

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top