What is social health in Marathi
सामाजिक स्वास्थ हा समाजशास्त्राचा एक विभाग ज्यामध्ये समाजाच्या स्वास्थ संवर्धनासाठी सभोवतालच्या परिस्थितीनुसार केलेली आरोग्य विषयक संसाधन युक्त व्यवस्था.
समाजाच्या स्वास्थ संवर्धनासाठी शरीराचे मनाचे वर्तन आणि सामाजिक स्वास्थ्याचा समावेश असतो.
सामाजिक स्वास्थ राखण्यासाठी आरोग्य विज्ञानाच्या सोबतीने सक्षम यंत्रणा निर्माण करून जनतेच्या स्वास्थ रक्षणाच्या कामी अनेक उपक्रम राबवीत आहे.
सामाजिक स्वास्थ रक्षणा कामी प्रत्येक व्यक्तीने आरोग्य विषयक सवयी लहानपणापासून आत्मसात केल्या. शाळा महाविद्यालयांमधून आरोग्य विषयी जागृती निर्माण करून दिली पाहिजे. स्वच्छता शुद्धता आणि सकस आहार याविषयी जनजागृती ही केली गेली पाहिजे. सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी ह्यामुळे नक्कीच मदत होईल.
आरोग्य विषयी सोयी सुविधा उपलब्ध करणे रोग प्रतिबंधक उपाययोजना राबवणे औषधोपचार सर्वांना उत्तम दर्जाचा व स्वस्त गरजेनुसार उपलब्ध असणे.
या गोष्टी सर्व जण माणसांत उपलब्ध करून देणे यावर काम करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी सुद्धा आपल्या परीने मदत करणे.
सामाजिक स्वास्थ टिकून राहण्यासाठी दुष्काळ पाणीटंचाई बेकारी बेरोजगारी नैसर्गिक आपत्ती परकीय आक्रमणे देशांतर्गत कलह इत्यादी प्रश्न मानव जात तिला भेडसावत असतात.
तर ह्या अशा प्रश्नांना समर्थपणे तोंड देऊन या कठीण परिस्थितीवर मात करून त्यावर मार्ग शोधून त्या उपाययोजना राबवणे यामुळे सामाजिक स्वास्थ अवलंबून असते. सामाजिक स्वस्त मानसिक आरोग्यावर अवलंबून असते.
सामाजिक स्वास्थ्यासाठी नातेसंबंध कुटुंबामध्ये चांगला संवाद असणे आवश्यक आहे मित्र सहकारी आणि कुटुंब विषयी सहानुभूती आणि काळजी असणे गरजेचे आहे.
तणाव आणि नैराश्य यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात हे स्वतःसाठी आणि काही प्रसंगी इतरांसाठी सुद्धा धोकादायक असतात यामुळे शरीरातील जुनाट आजारांची वाढ सुद्धा होऊ शकते.
सामाजिक स्वास्थ योग्य राहण्यासाठी ज्या हानिकारक परिस्थिती कारणीभूत असतात त्यांचे वितरण हे समान झाले पाहिजे.
एखाद्या व्यक्तीचे सामाजिक आरोग्य हे शिक्षण अर्थव्यवस्था वस्तू आणि सेवा समुदाय यावर निर्धारित करणे त्यामुळे या गोष्टीचे वितरण दर असमान झाले तर सामाजिक संस्थावर त्याचा परिणाम होतो त्याचा सामाजिक जीवन परिस्थितीवर निर्णय प्रभाव पडतो.
सामाजिक आरोग्य म्हणजे काय?
सामाजिक स्वास्थ म्हणजे काय ? What is social health in Marathi
सामाजिक स्वास्थ किंवा सामाजिक आरोग्य हे एक व्यक्ती किंवा समूहाच्या संपूर्ण कल्याणाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. यामध्ये अन्न, निवारा आणि आरोग्यसेवा यासारख्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.
जीवन आनंददायक बनविणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यास सक्षम असणे. यामध्ये कुटुंब, मित्र, सहकारी आणि समाजातील इतरांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता समाविष्ट आहे.
ज्याचे सामाजिक आरोग्य (स्वास्थ) चांगले असते, ती अशी व्यक्ती असते जी प्रभावीपणे संवाद साधू शकते, मजबूत नातेसंबंध निर्माण करू शकते आणि सकारात्मक सामाजिक संवादांमध्ये गुंतलेली असते.
अशा व्यक्ति विधायक मार्गाने संघर्ष हाताळण्यास आणि समाजाला सकारात्मक रीतीने योगदान देण्यास सक्षम आहेत.
सामाजिक स्वास्थ चे महत्वाचे घटक:
सामाजिक आरोग्याला हातभार लावणाऱ्या अनेक महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी काही गोष्टींमध्ये चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळणे, लोकांचे सहाय्यक नेटवर्क असणे, तुमच्या समुदायामध्ये सुरक्षित आणि आरामदायक वाटणे ई.समाविष्ट आहे.
सामाजिक आरोग्याचे पैलू कोणते आहे?:
What is social health in Marathi
सामाजिक आरोग्याचे अनेक प्रमुख पैलू आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
संप्रेषण (communication):
सक्रियपणे ऐकण्याची आणि इतरांना स्पष्ट आणि प्रभावीपणे व्यक्त करण्याची क्षमता समाविष्ट आहे. चांगली संभाषण कौशल्ये सकारात्मक संबंध निर्माण करण्यास आणि गैरसमज किंवा संघर्ष टाळण्यास मदत करतात.
नातेसंबंध (Relationship):
सामाजिक आरोग्याचा ह्या पैलू मध्ये इतरांशी निरोगी आणि सहाय्यक नाते संबंध तयार करण्याची आणि टिकवून ठेवण्याची क्षमता दर्शवितो. यात सहानुभूती, विश्वास, आदर आणि समज, तसेच संघर्ष आणि आव्हानां मधून कार्य करण्याची क्षमता यात समाविष्ट आहे.
सामाजिक समर्थन (Social Support):
याचा अर्थ कुटुंब, मित्र आणि समुदाय मधील सदस्यांची सहाय्यक लोकांच्या नेटवर्कची उपस्थिती आहे, जे गरज पडल्यास भावनिक, व्यावहारिक आणि इतर कुठल्याही प्रकारची मदत करू शकतात.
सामुदायिक सहभाग (Community Engagement):
सामाजिक आरोग्याच्या या पैलूमध्ये एखाद्याच्या समुदायीक कामांमध्ये सक्रियपणे सहभागी घेणे , स्वयंसेवा करणे आणि समाजात अर्थपूर्ण रीतीने योगदान देणे ई. समाविष्ट आहे. याने आपलेपणा, उद्देश आणि पूर्तता तसेच सामाजिक संबंध आणि समर्थनाची भावना वाढीस लागते.
विविधता आणि समावेश (Diversity and Inclusion):
सामाजिक आरोग्याच्या या पैलूमध्ये व्यक्ती, संस्कृती आणि विविध समुदायामधील फरक ओळखणे आणि त्यांचा आदर करणे. आणि सर्वांसाठी समावेश आणि समानतेला प्रोत्साहन देणे ह्या पैलू मध्ये समाविष्ट आहे. यात मोकळे मनाचा, सहनशील आणि सक्रियपणे विविध दृष्टीकोन आणि अनुभव शोधणे समाविष्ट आहे.
सामाजिक आरोग्याचे महत्त्व:
सामाजिक स्वास्थ म्हणजे काय ? What is social health in Marathi यात सामाजिक आरोग्याचे महत्त्व जाणून घेऊ.
सामाजिक आरोग्य हा एकंदर आरोग्य आणि कल्याणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि ते महत्त्वाचे का आहे याची अनेक कारणे आहेत:
मानसिक आरोग्य (Mental Health):
सामाजिक संबंध आणि सकारात्मक आरोग्य हे आरोग्य संबंधित विकास कामे करण्यास मदत करू शकतात.
चांगले सामाजिक समर्थन हे नैराश्य आणि चिंता कमी करण्यास मदत करते. ह्यामुळेच सामाजिक स्वास्थ बरोबरच मानसिक आरोग्य जपणे सुद्धा महत्वाचे आहे.
शारीरिक आरोग्य (Physical Health):
सामाजिक संबंध आणि सामाजिक समर्थन हे देखील चांगले शारीरिक आरोग्यच्या परिणामांना प्रोत्साहन देतात.
उदाहरणार्थ, हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या आजारांत सामाजिक समर्थन मिळाल्यास या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.. कारण ह्या आजारांत कौटुंबिक आणि सामाजिक साथ भेटली तर ही आजार लवकर बरे होण्यास मदत होईल.
सामाजिक समर्थन तणाव आणि जीवनातील कठीण प्रसंगाना सामना करण्यास मदत करू शकते,
जसे की नोकरी गमावणे किंवा दीर्घकालीन आजार. ह्यामध्ये सपोर्ट सिस्टीम सोबत असल्याने जीवनातील अडथळे हाताळण्यासाठी अधिक प्रेरणादाई आणि खंबीर वाटेल आणि जीवनातील आव्हाने पार करण्यास बळ मिळेल.
आपुलकीची भावना (A sense of belonging):
सामाजिक नातेसंबंध आपेलापणा आणि मनाने जोडले जाण्याची भावना वाढीस लागते. इतरांशी जोडलेली भावना ही आत्मसन्मान वाढवण्यास मदत करते आणि व्यक्तींना त्यांच्या जीवनाबद्दल अधिक सकारात्मक आणि प्रेरणादाई वाटू लागते.
वैयक्तिक वाढ (Personal Growth):
इतरांशी संवाद साधण्याने एकाच गोष्टीविषयी भिन्न दृष्टीकोन बघायला मिळतात. आणि अनुभवामुळे वैयक्तिक वाढ होण्यास मदत होते. ह्यामुळे समाजशील माणूस म्हणून विकास होण्यास मदत होते. ह्यामुळे नवीन क्षितिजे पादाक्रांत करू शकतात आणि त्यांना नवीन कौशल्ये आणि छंद विकसित करण्यात मदत होऊ शकते.
सामाजिक स्वास्थ म्हणजे काय ? What is social health in Marathi ह्या लेखात आपण माहिती घेतली सामाजिक आरोग्य किंवा स्वास्थ.
सामाजिक आरोग्याचे महत्व त्याचे फायदे ई. गोष्टी बद्दल आपण माहिती घेतली.