Unlocking Lunar Secrets: Chandrayaan-3 ‘s Ambitious Journey to the Moon | चंद्राचे रहस्य उलगडण्यासाठी: चांद्रयान-3 ची चंद्रावरील महत्वाकांक्षी यात्रा

Spread the love

चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर यशस्वी लॅंडींग.

सर्वप्रथम आपल्या इस्रो (ISRO) च्या टीम चे अभिनंदन. सर्व शास्त्रज्ञ , संशोधक यांचे अभिनंदन . 

भारताने इतिहास रचला आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील  पहिला देश ठरला आहे. 

चंद्रयान ३ हे भारताचे चंद्रयान मोहिमेचे  ३ रे मिशन आहे.  या आधी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) २ यान चंद्रावर पाठवले आहेत. 

इस्रो ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे, हिचे केंद्र बंगलोर येथे आहे. आणि यान परक्षेपण ठिकाण श्रीहरीकोटा  येथे आहे.

हे यान लँडर “विक्रम”  आणि रोवर “प्रज्ञान”  सोबत अवकाशात १४ जुलै २०२३ रोजी झेपावले (chandrayaan 3 launching) होते. 

अशाच प्रकारचे  लँडर व रोवर हे चंद्रयान २ मध्ये सुध्दा वापरले होते. 

प्रॉपल्शन मोडयूल द्वारे लँडर व रोवर यांना  चंद्राच्या कक्षेत स्थापित करण्याकरिता वाहून नेले गेले. 

चंद्रयान ३ हे  “१४ जुलै २०२३”  रोजी अवकाशात प्रक्षेपित केले गेले. आणि लँडर व रोवर यांची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट २०२३ साय. ६.०२ मी यशस्वीरित्या  उतरले. 

या यशस्वी लॅंडींग द्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. 

chandrayaan-3
image by ISRO

चंद्रयान ३ मोहिमेची पार्श्वभूमी  

भारतीय चंद्रयान कार्यक्रम अंतर्गत इस्रो द्वारे (ISRO) “चंद्रयान २”  २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केले होते. 

हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सप्टेंबर २०१९ मध्ये संभाव्य लॅंडींग करणार होते, परंतु तेव्हा   ही लॅंडींग अयशस्वी झाली होती. 

लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  उतरण्याच्या प्रयत्नात असताना आपल्या उतरण्याच्या इच्छित मार्गापासून विचलित झाल्याने अखेर ते लँडर कोसळले होते. 

या अपयशाने खचुन न जाता इस्रो ने “चंद्रयान ३” (chandrayaan-3)मोहीम आखली होती. 

या चंद्रयान मोहिमेत इस्रो सोबत युरोपियन स्पेस एजन्सि सुध्दा  सोबत काम आणि सहकार्य केले आहे. 

या परस्पर सहकार्य मध्ये इस्रो (ISRO) आणि युरोपियन स्पेस एजन्सि सोबत सूर्य संशोधन साठी पुनः एकत्र काम करता आहे. 

chandrayaan-3
Launch | image bay ISRO

चंद्रयान 3 मोहिमेची उद्दिष्टे काय आहे

आता आपण चंद्रयान तर चंद्रावर पाठवले परंतु याची उद्दिष्टे काय आहे?, इतका खर्च आणि मेहनत करून आपण किंव जगातील इतर सुध्दा देश आपापले याने हे अवकाशात किंवा  चंद्रावर का पाठवत असतात? 

चला तर थोडक्यात माहिती करून घेऊ 

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो (ISRO) द्वारे चंद्रयान ३ (chandrayaan-3) मोहिमेसाठी मुख्यत: ३ उद्दिष्टे ठरवली आहे किंवा निश्चित केली आहे. 

ज्यामध्ये खालील नमूद केलेल्या आहे:

  1. लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरविणे.
  2. चंद्राच्या पृष्ठभागावर  रोव्हर फिरण्यासाठीच्या क्षमतेचे निरीक्षण करून प्रात्यक्षिक करणे.
  3. यादवरे चंद्राच्या जमिनीची रचना चांगल्या  व योग्य प्रकारे समजून घेऊन आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेले नैसर्गिक घटक व रासायनिक घटक, माती, पाणी , इत्यादि उपलब्ध गोष्टीवर प्रयोग करून वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवणे. आणि त्याच बरोबर   इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी लागणरे नवीन तंत्रज्ञान विकसित करून   त्याचे प्रात्यक्षिक करणे.  

अंतराळयानाविषयी

अंतराळयानमध्ये  तीन मुख्य घटक आहे ज्यांचा समावेश चांद्रयान-३ (chandrayaan-3) केला आहे.

प्रोपल्शन मॉड्यूल

प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे  लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी  100 किलोमीटर पर्यन्त (62 मैल) घेऊन जाते. 

प्रोपल्शन मॉड्यूलची रचना ही बॉक्ससारखी असून त्याच्या  एका बाजूला मोठा सोलर पॅनेल बसवलेला असतो, आणि वर लँडरसाठी (इंटरमॉड्युलर अॅडाप्टर कॉन) बेलनाकार  ( cylindrical) माउंटिंग स्ट्रक्चर बसवलेले  आहे. 

लँडर

विक्रम लँडरद्वारे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग ही  जबाबदाररित्या पार पाडली जाते.

विक्रम लँडर हे सुध्दा बॉक्सच्या आकाराचे आहे, ज्यात चार लँडिंग पाय आणि चार लँडिंग थ्रस्टर्स (thrusters) आहे, जे प्रत्येकी 800 न्यूटन थ्रस्ट (newtons thrust) तयार करण्यासाठी  सक्षम आहेत.

विक्रम लँडरद्वारे रोव्हर आणि विविध वैज्ञानिक उपकरणे नेली जातात.  ज्याद्वारे त्या जागेचे ऑन साइट  विश्लेषण केले जाऊ शकते.

रोव्हर

प्रज्ञान रोव्हर हे  सहा चाकांचे वाहन आहे,  त्याचे वजन हे जवळपास  २६ किलोग्रॅम (५७ पौंड) इतके आहे. 

प्रज्ञान रोव्हरचा  आकार हा  ९१७ मिमी x ७५० मिमी  x ३९७ मिमी इतका  आहे. 

या प्रज्ञान रोव्हर द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाच्या  रचनाविषयी माहिती , चंद्राच्या मातीतील पाण्यात  बर्फाची असलेली उपस्थिती हे निरीक्षण नोंद करणे, 

तसेच  चंद्राच्या उत्क्रांतीचा  इतिहास आणि चंद्रा वरच्या  वातावरणाच्या विषयी चे  संशोधन तसेच निरीक्षण  प्रज्ञान रोव्हरदवरे  नोंदी घेतल्याजातील  अशी अपेक्षा आहे.

मोहिमेचा कार्यकाळ

  • प्रोपल्शन मॉड्यूल: लँडर आणि रोव्हरला 100 किलोमीटर कक्षेपर्यंत घेऊन जाणे,  आणि याचा कार्यकाळ हा 6 महिन्यांपर्यंत असु शकतो. 
  • लँडर मॉड्यूल: 1 चंद्राचा दिवस (lunar day) (म्हणजे 14 पृथ्वी वरील  दिवस)
  • रोव्हर मॉड्यूल: 1 चंद्राचा दिवस (Lunar day) (म्हणजे 14 पृथ्वी वरील  दिवस)

चंद्रयान मोहिमेची टीम

इस्रो अध्यक्ष (ISRO Chairperson): एस. सोमनाथ

मिशन डायरेक्टर (Mission Director) : एस. मोहनकुमार

सहयोगी मिशन निर्देशक (Associate Mission Director): जी.  नारायणन

प्रकल्प संचालक (Project Director): पी. वीरमुथुवेल

उपप्रकल्प संचालक(Deputy Project Director) : कल्पना . के

वाहन संचालक (Vehicle Director) : बिजू सी. थॉमस

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा !


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top