व्यवसाय सुरू करताना महत्वाच्या स्टेप्स

Spread the love

व्यवसाय कसा सुरू करायचा | how to start business in Marathi

नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात आपण माहिती घेणार आहोत व्यवसाय कोणता करायचा आणि तो प्रत्यक्षात कसा सुरू करायचा.

सर्वप्रथम जो व्यवसाय करणार आहोत त्याचे स्वरूप काय आहे? जसे, उत्पादन किंवा सेवा. जर उत्पादन हा तुम्ही व्यवसाय निवडला असेल तर,

तुम्ही जे उत्पादन घेणार आहात त्या विषयी संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. जर तुमचा व्यवसाय हा सेवा पुरवणे असेल तर,

तुमचे ग्राहक कोण आहे?, त्या सेवेची नेमकी गरज आहे का?, आणि कशी सेवा पुरवणार? इतर कोणाशी व्यावसायिक स्पर्धा होणार आहे

हे वस्तु अथवा सेवा ही कितीकाळ गरजेची राहु शकेल ई. बाबीचा मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

वरील प्रश्नांची उत्तरं सकारात्मक मिळाली की पुढील टप्पा ते उत्पादन करण्याचा व पोचवण्याचा.

यासाठी किती खर्च येणार आहे. किती भांडवल लागणार आहे व लागणार मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा कसें यांवर विचार करावा.

व्यवसाय कसा सुरू करायचा | how to start business in Marathi
व्यवसाय कसा सुरू करायचा | how to start business in Marathi

व्यवसाय कसा सुरू करायचा | how to start business in Marathi आता आपण स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊ .

योजना तयार करा -Make a plan :

नवीन व्यवसाय करतांना व्यवसायाच्या प्रारंभी एक योजना तयार करणे आवश्यक आहे.

व्यवसाय प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला योजनेची आवश्यकता आहे.

आपल्या वित्तीय योजना करा – Make your financial plan

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खर्चाचे नियोजन करणे हे अत्यावश्यक आहे.

छोटासा व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप पैश्यांची आवश्यकता नसते. परंतु त्यात काही प्रारंभिक गुतवणुक असते.

परवाने व परवानग्या, उपकरणे, कायदेशीर फी, विमा, ब्रॅण्डिंग, बाजार संशोधन, यादी, ट्रेडमार्क ( गरज असल्यास) भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम, मालमत्ता पट्टी ई. अंदाज लावणारे स्प्रेडशीट एकत्र करून आपण त्याचा अभ्यास करून आपला व्यवसाय किमान 12 महिने चालू ठेवणे आवश्यक आहे.

त्यासाठी खर्चाची तरतूद व्यवसायाच्या प्रारंभी केलेली योग्य राहील.

 उपयुक्तता (utility) , भाडे, विपणन, जाहिरात, उत्पादन, पुरवठा, प्रवास खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार, आपलं स्वतचा पगार ई. खर्च सुध्दा आगाऊ हिशोबत मांडणे आवश्यक आहे.

 ह्या मुळे सुरवातीच्या काही महिन्यात व्यवसाय नीट चालला नाही तरी काम सुरळीत चालू राहते.

 यासाठी financial प्लॅनिंग महत्वाचे आहे.

व्यवसायाची रचना निवडा – Choose a business structure

आता पुढची पायरी व्यवसायाची रचना कशी असेल असे ठरवणे.

व्यवसाय कसा सुरू करायचा | how to start business in Marathi यात आपण माहिती करून घेऊ व्यवसायाच्या रचनेची.

म्हणजेच आपला व्यवसाय एकल मालकी, भागीदारी, मर्यादित दायित्व कंपनी किंवा कॉर्पोरेशन असेल हे ठरवणे.

यानंतर आपण निवडलेल्या व्यवसायाचा घटक आपल्या व्यवसायाच्या नावापासून, आपल्या दायित्व वर अणि आपण आपले कर कसे भराल यावर परिणाम करेल.

व्यवसायाचे नाव निवडून नोदणी करणे:

आपल्या व्यवसायाचे नाव निवडताना काळजीपुर्वक निवडणे,

नावातून व्यवसायाची ओळख झाली पाहिजे असेही नाव निवडू शकता.

आपल्या व्यवसायाचे नाव महत्वाची भूमिका बजावत असते.

नावाला साजेसा छानसा लोगो सुध्दा तयार करणे आवश्यक आहे.

यानंतर व्यवसायाच्या नावाची कायदेशीर नोदणी करणे पण गरजेची आहे.

परवाने व परवानग्या मिळवणे:

स्वतचा व्यवसाय सुरू करतांना पेपरवर्क प्रक्रियेचा एक भाग असतो.

व्यवसायासाठी कोणते परवाने व परवानग्या लागू आहेत या विषयी संशोधन करणे आवश्यक आहे.

व्यवसायाच्या प्रकरावर अणि कोठे स्थित आहे यावर अवलंबून अनेक छोटे मोठे परवाने आणी परवानग्या लागू शकतात.

अकाउंटिंग सिस्टीम

जरी छोटा व्यवसाय असला तरी व्यवसायात व्यवस्था बघताना योग्य लेखा प्रणाली ( अकाउंटिंग सिस्टीम) असणे गरजेची आहे.

ह्या मुळे व्यवसायाची प्रगती विषयी माहिती मिळत राहते.

व्यवसायाचे स्थान किंवा जागा निश्चित करणे:

व्यवसाय कार्यरत करण्यासाठी जागा निश्चित करणे खूप महत्वाचे आहे,

योग्य जागा निश्चिती वेळ, पैसा, श्रम ई वाचवण्यात मदत करेल

सेवा क्षेत्र असेल तर व्यवसाय वाढण्यास उपयुक्त ठरेल.

 कार्य संघ तयार ठेवा -Get your team ready

जर आपण कर्मचार्‍यांना कामावर घेत असाल तर आता ही प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली आहे. आपणास आवश्यक असणारी पदे आणि प्रत्येक पदाचा भाग असलेल्या नोकरीच्या जबाबदाऱ्यांची ची रूपरेषा काढण्यासाठी आपण वेळ घेत असल्याचे सुनिश्चित करा.

व्यवसायाची जाहिरात करा:

एकदा व्यवसाय चालू झाल्यानंतर जाहिरात करणे गरजेची आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योग्य जाहिरात करणे चालू करा.

आपल्या व्यवसायाचा अधिक प्रभावी पणे कसा प्रचार करायचा ह्याची रणनीति ठरवू शकता.

ह्या मुळे योग्य ग्राहकापर्यंत आपली जाहिरात पोहचेल.

व्यवसाय कसा सुरू करायचा | how to start business in Marathi ह्या लेखात आपण जाणून घेतल , व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सुरवातीच्या काही महत्वाच्या स्टेप्स.

इतर लिंक्स :

पर्यावरणास जपण्याचे 12 सोप्पे उपाय

मनाचे आरोग्य


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top