कर्माचा सिद्धांत karmacha Siddhant

Spread the love

कर्माचा सिद्धांत Karmacha Siddhant

चांगले कर्म विरुद्ध वाईट कर्म

कर्माची विभागणी चांगल्या आणि वाईट कर्मांमध्ये केली जाऊ शकते.

चांगले कर्म हे इतरांसाठी दाखवलेल्या दयाळू वृत्तीचे परिणाम आहे, तर वाईट कर्म हे जाणून बुजून इतरांना दिलेल्या त्रासाचे परिणाम आहे

जर तुमच्या कार्यामुळे अनंतकाळ वेदना दु:ख आणि त्रास झाला असेल  तर ते अधर्मी किंवा विनाशकारी, नकारात्मक, मानले जातात. जर तुमच्या कार्यामुळे आनंद झाला असेल तर ते  सकारात्मक आणि सद्गुण मानले जातात.

कर्माचे मानसशास्त्र मुळात असे आहे की , चांगल्या हेतूने वागले तर आनंद मिळेल. आपण वाईट हेतूने वागल्यास, समस्या येतील.

चांगले कर्म कधी कधी असे प्रसंग घडवून आणते की,जे लोक कर्मावर विश्वास ठेवत नाहीत ते देखील असा विचार करतात की, चांगल्या कर्मांमुळे चांगले परिणाम होतात.

कर्म ही अशी गोष्ट आहे जी  तुम्ही स्वत: करता आणि त्याचे चांगले वाईट फळ भोगता. ते तुम्ही इतराना वाटू शकत नाही तुमचा भार हलका करण्यासाठी ते तुम्हालाच भोगून संपवायचे आहे.

कर्माचा सिद्धांत Karmacha Siddhant

या स्पर्धेचे युगात मनुष्य एकमेकांना कमी लेखतात, आणि सभोवतालच्या   माणसांचा  दर्जा स्टेटस हा त्याच्या उत्पन्नावर, जात,  धर्म यावरून ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. यातच आपला अमूल्य वेळ व्यर्थ घालवतात. माणसांचा भौतिक प्रगती वरुण एखाद्याचे स्टेट्‍स ठरविणे ही चुकीचे तर आहेच.

पण या जगात असेही खूप माणसं आहेत, ज्यांचे विचार चांगले आहेत अवघ्या मनुष्य जातीचा उत्कर्ष करण्याचे त्यांचे ध्येय असते.तसा ते प्रयत्न देखील अविरत करत असतात त्या दृष्टीने ते त्यांचे कर्म करत असतात.

म्हणूनच एक मोलाचे सांगू इच्छितो जात धर्म कोणताही असो चांगला माणूस बना  चांगली कर्म करा कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही ….

जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म हे करावेच लागते कर्म हे  अटळ आहे.

 जन्माला आल्यानंतर जगण्यासाठी श्वास हा घ्यावा लागतो तो श्वास घेणे हे सुद्धा एक कर्म झाले. म्हणजेच जगण्यासाठी श्वास घेणे कर्म आहे तसेच उदरनिर्वाहासाठी साठी केले जाणारे काम पण कर्मच आहे.

परंतु ह्या बरोबरच आपल्याकडून कळत नकळत काही कर्म ही  होत असतात.

कर्म ही अशी गोष्ट आहे की जे इतरांसाठी पेराल , तेच आपल्यासाठी उगवेल.

त्यामुळे कोणतेही कार्य विचारपूर्वक केले पाहिजे. ज्याने इतरांना कळत-नकळत त्रास होणार नाही.

कर्माचे प्रकार :

कायिक व वाचिक

कायिक कर्म :

   कर्म म्हणजे एखाद्या जिवाला आपल्याकडून शारीरिक कष्ट होणे किंवा आपल्यामुळे एखाद्या जीव कष्टप्रद होणे हे झाले कायीक कर्म.

वाचिक कर्म:

आपल्या मुखातून निघालेल्या वाणीने एखाद्या जीवाला त्रास होणे, त्याला अपशब्द बोलून त्याचा अपमान करणे. एखाद्या जिवाला त्याच्या सामाजिक स्थितीवरून अपमानित करणे त्याचा उपहास उडवणे हे झाले वाचिक कर्म.

बरं असे कर्म आपल्याकडून कळत नकळत होत असतात.  तो अभागी आपल्यामुळे दुखावला जातो तो त्याच्या नशिबाला दोष देत असतो आणि आपले जीवनरहाटी  जगत असतो.

कर्माचा सिद्धांत Karmacha Siddhant
कर्माचा सिद्धांत Karmacha Siddhant

कर्माचा हिशोब:

आयुष्यात आपण केलेले कर्म हे कोणत्या न कोणत्या प्रकारे आपल्यासमोर येतच असते.

आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि भविष्यात केव्हातरी हे कर्म आपल्यासमोर प्रकट होतातच.

जर आपण चांगली कर्म केली असतील लोक उपयोगी कामे केले असतील कोणाला दुखावलेले नसेल सदा आपण इतरांकडून आशीर्वादच घेतलेली असतील शुभ वचने ऐकले असतील तर भविष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीचा सामना हे आपण केलेले चांगले कर्म निभावून लावतात.

जर आपण कर्म करताना त्रास होईल असे कर्म केले असतील मन दुखावले असतील कुणाविषयी वाईट साईट बोलला असेल कायीक आणि वाचिक कर्म हे आपल्या द्वारे वाईट झाले असतील तर आयुष्यात कदाचित आपल्यापुढे अशी परिस्थिती निर्माण होते की कधीकधी छोटीशी अडचण सुद्धा आपल्याला मोठी वाटते. तिच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही त्यावेळेस आपल्याला आपण केलेल्या कर्म ची आठवण होऊन पश्चाताप झाला तर अतिशय योग्य आहे.

आपल्या हातून चांगली कर्मे होत राहिली तर नक्कीच मानसिक समाधान मिळते. त्याने मनाचे आरोग्य चांगले राहते.

कर्म हे योग्यच असावे त्यात स्वतःचा फायदा होईल आणि दुसऱ्याचे नुकसान होईल असे हे कदापि नसावे जर कर्मशुद्ध असले तर त्याचे फळ सुद्धा शुद्धच मिळेल परंतु लालसे पोटी आपल्याकडून वाईट कृत्य घडू शकते त्यासाठी माणसाने परोपकारी वृत्ती आत्मसात करावी ज्यामुळे आपल्याकडून वाईट कृती होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या फळ सुद्धा वाईट रूपात मिळणार नाही.

इतर लिंक्स :

पर्यावरणास जपण्याचे 12 सोप्पे उपाय Paryavaran Japnyache 12 upay

मनाचे आरोग्य -1 Minds Health – 1


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top