मृदाचे प्रकार | Matiche Prakar
मृदा हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सेंद्रिय पदार्थ आणि अजैविक घटकांचे मिश्रण आहे.
जे वनस्पतींच्या वाढीस मदत करते .
मृदा ही खनिजे, पाणी, हवा आणि सेंद्रिय पदार्थांची बनलेली आहे, जसे की सडणारी वनस्पति, खंडकांचे विघटन, ई.
मातीतील खनिजे खडकांच्या विघटनाने तयार होतात आणि वाळूपासून चिकणमातीपर्यंत वेगवेगळ्या आकारांची बनलेली असतात.
मातीमध्ये सूक्ष्मजीव देखील असतात, जसे की जीवाणू आणि बुरशी, जे पोषक चक्र आणि विघटन मध्ये महत्वाची भूमिका बजावतात.
हवामान, स्थलाकृति आणि वनस्पती यांसारख्या घटकांवर अवलंबून मातीची रचना, रचना आणि रचना बदलू शकते.
माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधन आहे, जी कृषी आणि वनीकरण उत्पादनासाठी महत्वाची आहे. जैवविविधतेला वाढीस मदत होते
मृदाचे प्रकार | Matiche Prakar
महाराष्ट्रात मुख्यत: पाच प्रकार आढळतात. मृदा निर्मितीसाठी हजारो वर्ष लागतात. खडकाची झीज होऊन मृदेत रूपांतर होते. नदीच्या सखल मैदानी विस्तृत प्रदेशात पुराद्वारे वाहून आणलेली गाळाची मृदा तयार होते. मृदेत अनेक खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीव आढळतात.
काळी मृदा
बेसॉल्ट प्रकारच्या खडकाची झीज होऊन या मृदेची निर्मिती होते. काळ्या मृदेस रेगूर मृदा असेही म्हंटले जाते.
या मृदेला काळा रंग टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या मातीतील घटकामुळे प्राप्त होतो.
या मृदेमध्ये घटक द्रव्ये हे लोह, पोटाश, magnesium, कॅल्शियम,चुनखडी या द्रव्यांचे प्रमाण असते
तर सेंद्रिय द्रव्यांचे आणि नायट्रोजन फॉस्फरसचे हे प्रमाण कमी असते.
ही काळी मृदा अत्यंत सुपीक मृदा आहे. आणि काळ्या मृदेत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता ही सर्वाधिक असते.
महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद, अहमदनगर अमरावती, बुलढाणा, परभणी, हिंगोली, अकोला,जळगाव, वाशिम, जिल्ह्यांमध्ये ही मृदा प्रामुख्याने आढळते.
महाराष्ट्रात ऊस,गहू,फळे, कडधान्य, ज्वारी,कापूस, ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.
जांभी मृदा
ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, 2000 मिलिमीटरपेक्षा जास्त असतो आणि काही काळ पाऊस पडत नाही अशा ठिकाणी जांभी मृदा आढळते.
कायम खडकातून पानी झिरपल्याने खडकातील क्षार आणि silicon चे कण ही वाहून जातात, परिणामी मृदेत अलुमिनीयम व लोह यांचे प्रमाण वाढते.
या मृदेमध्ये फॉस्फरस, नायट्रोजन, सेंद्रिय पदार्थ या द्रव्यांचे प्रमाण हे कमी आढळते . या मृदेची सुपीकता ही कमी असते.
ही मृदा पानी टिकवून ठेवू शकत नाही, त्यामुळे शेतीसाठी सिंचनासाठी ही मृदा अयोग्य आहे.
महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, जिल्हयात ही मृदा आढळते. या मृदेमध्ये होणारे तांदूळ हे प्रमुख पिक आहे.
डोंगर उतारावर ह्या मातीत फळांचे उत्पादन घेतले जाते.
गाळाची मृदा
नदीच्या पुरा बरोबर माती वाहून येत असते त्याचबरोबर खडकांची पण झीज होते, आणि सखल मैदानात
गाळाच्या साठण्यामुळे नदी खोर्यांच्या सखल मैदान भागात पूर आलेल्या मैदानात ही गाळाची मृदा ही मोठ्या प्रमाणात आढळते.
या मृदेचा पोत हा बारीक असतो आणि पाण्याची पण उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहिल्याने मृदा हि सुपीक बनते.
महाराष्ट्रात मुख्य मोठ्या नद्यांच्या सखल मैदानी भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.
महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्यात खूप खोलवर पुरामुळे गाळाचे संचयन झालेले आहे. या भागात विस्तृत गाळाच्या मृदांचे क्षेत्र बनले आहे.
ही मृदा अत्यंत सुपीक असते आणि त्यामुळे या मृदेत विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
तांबडी-पिवळसर मृदा
महाराष्ट्रात अनंत काळापासून गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांचा झीज किंवा अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.
या मृदेत लोहाचे प्रमाण हे जास्त असल्याने तिचा रंग तांबडा आहे. ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा आहे.
या मृदेतील घटक द्रव्यांमुळे तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाडी असा असू शकतो.
मृदेमध्ये कार्बोनेट, फॉस्फरिक अॅसिड, चुनखडी, पोटॅश व सेंद्रिय द्रव्य चे प्रमाण अत्यल्प असते.
महाराष्ट्रात ही तांबडी पिवळसर मृदा गडचिरोली,गोंदिया,भंडारा, नागपूर चंद्रपूर, या जिल्ह्यात आहे.
या मृदेत घेता येणाऱ्या पिकामध्ये बाजरी, भात, भुईमुंग , इत्यादि पिके घेता येतात.
या मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो.
ही मृदा रासायनिक खतांसाठी चांगली आहे, त्यांना लवकर प्रतिसाद देते.
चिकण मृदा
गाळाचे प्रमाण अधिक असल्याने या मृदेतुन पाणी सहजासहजी झिरपत नाही.
पाण्याचा निचरा लवकर होत नाही, माती ओलावा टिकून ठेवते याकारणाने ही मृदा सुपीक असते.
महाराष्ट्रात गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली, नागपूर, व जिल्ह्याच्या उत्तर भागात ही मृदा आढळते.
भाताच्या पिकास ही मृदा उत्तम असते.
ऊस,ज्वारी, गहू यासारखी इतरही पिके घेतली जातात.
👍🏼