गिधाडे नामशेष होत आहेत का? why vultures are getting extinct

Spread the love

why vultures are getting extinct

निसर्गातील सफाई कामगार “गिधाड” :

गिधाड हा गरुडापेक्षा मोठा पक्षी आहे आणि तो नैसर्गिक कारणांमुळे मरण पावलेल्या प्राण्यांच्या शवांना खातो. त्यामुळे कावळ्याप्रमाणेच गिधाडालाही ‘निसर्गातील सफाई कामगार’ म्हणून ओळखले जाते.

गिधाड हा संपूर्ण जगात आढळणारा एक मोठा शिकारी पक्षी आहे.  गिधाड ही त्यांच्या विशिष्ट डोके आणि आकड्यासारख्या चोचीसाठी ओळखले जातात, ज्याचा वापर ते मृतप्राण्यांचा देह खाण्यास करतात.

गिधाडे निसर्गात खूप महत्वाचे आहेत कारण ते प्राण्यांच्या शरीराची विल्हेवाट लावून रोग टाळण्यास मदत करतात. गिधाडे हे कार्य अनेक वर्षांपासून करत आहे. आणि हे स्पष्ट आहे की सर्व महान संतांनी या त्यांच्या या महत्त्वपूर्ण निसर्ग ऋणाचा उल्लेख केला आहे.

पूर्वी गावाबाहेर एखादा प्राणी मेला की काही तासांतच बरीच गिधाडे दिसायची. आणि सर्व काही खूप लवकर त्यांच्या द्वारे साफ केले जाई.

गिधाडांची  दृष्टी तीक्ष्ण असते त्यामुळे गिधाडे उंचावरून  अशा गोष्टी पाहू शकतात जे इतर प्राणी पाहू शकत नाहीत. त्यांमुळे त्यांना  जंगलात अनेकदा मृतदेह  लवकर दृष्टीस पडतात इतर प्राण्यांच्या तुलनेत. त्यामुळे ते सर्वात प्रथम तिथे पोहचून मिळून शवाच फडशा पाडतात.

गिधाडांच्या प्रजाती (Species of vultures):

जगभरात गिधाडांच्या 22 विविध प्रजाती आढळतात.

गिधाडांच्या अनेक प्रजाती आढळतात, ज्यात कंडोर, तर्की गिधाड, युरेशीयन ग्रिफ्रॉन यांचा समावेश आहे.

भारतात ” पांढऱ्या पाठीचे गिधाड, हिमालयीन गिधाड, राज गिधाड, लांब चोचीचे गिधाड, पांढरे गिधाड, युरेशीयन गिधाड, काळे गिधाड” या जाती आढळतात.

गिधाडांची संख्या कमी होण्याचे कारण:

why vultures are getting extinct

1990 च्या दशकात, “ डायक्लोफेनाक” नावाचे औषध प्राण्यांच्या शरीरामध्ये  वेदना आणि  सुज कमी करण्यासाठी वापरले जात असे.

इतर औषधांच्या तुलनेत हे औषध  स्वस्त असल्याने त्या काळात ते खूप लोकप्रिय झाले. हे औषध प्राण्यांना दिल्यानंतर  त्याच्या वापराने जनावरे बरे झाले. परंतु औषधाचे अंश शरीरात राहत होता.

औषधाने उपचार केलेल्या जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे दूषित मांस खाणाऱ्या गिधाडांना या औषधामुळे विषबाधा होऊ लागली आणि त्यांच्या किडनीवर विपरीत परिणाम होऊन गिधाडे मोठ्या प्रमाणात मरू लागली.

‘पेरेग्रीन फंड, इंग्लंड’ आणि ‘ऑर्निथॉलॉजिकल सोसायटी ऑफ पाकिस्तान’ या संस्थांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात, पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा 2000 मध्ये, मृत गिधाडांच्या शवविच्छेदनात डायक्लोफेनाकमुळे गिधाडांचा मृत्यू झाल्याचे पुरावे मिळाले.

why vultures are getting extinct

गिधाड |why vultures are getting extinct | गिधाडे नामशेष होत आहेत का

औषधावर बंदी:

 भारतात  2006 मध्ये, सरकारने प्राण्यांवर उपचार करण्यासाठी “डायक्लोफेनाक” नावाचे औषध वापरणे बंद करण्याचा निर्णय घेतला.

तरीही  “डायक्लोफेनाक” वापर होतच  असल्याने भारत सरकारने  सन २०१५ मध्ये त्याच्या उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घातली.

परंतु अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, डायक्लोफेनाक, एसेक्लोफेनाक, नाइमसुलाइड आणि केटोप्रोफेन यासारख्या काही औषधांचा गिधाडांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो.

काही पर्यायी औषधांचा (जसे की मेलॉक्सिकॅम आणि टॉल्फेनामिक ऍसिड) गिधाडांवर कोणताही विपरीत परिणाम करत नाही. त्यामुळे यांचा वापर आणि प्रसार वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न पशू संवर्धन विभागाच्या वतीने प्रयत्न केले गेले पाहिजे.

गिधाडे संवर्धनाचे कार्य:

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) सरकारला गिधाडांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र हे सुरक्षित ठिकाण घोषित करण्याची मागणी 2022 मध्ये केली.

जागतिक गिधाड संवर्धन जागरूकता दिनाच्या दिवशी ही मागणी करण्यात आली. जो सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो.

महाराष्ट्रात गिधाडे ग्रामीण आणि वनक्षेत्रात पूर्वी सर्रास आढळत होते . तथापि, आज ते बहुतेक फक्त मेळघाट, पेंच आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागातच  आढळतात..

महाराष्ट्रात गडचिरोली, नाशिक आणि ठाणे येथे गिधाडांसाठी खास असे  रेस्टॉरंट्स आहेत जिथे गिधाडांना डायक्लोफेनाक मुक्त मांस खायला मिळते. संकल्पना चांगली आहे जी सर्वत्र राबवली पाहिजे.

जेणेकरून गिधाडांना विषमुक्त मांस खायला मिळेल आणि त्यांना जीवनदान मिळेल, आणि नैसर्गिक संतुलन पण स्थिर राहील.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, महाराष्ट्र वन विभाग आणि इंडियन व्हल्चर फाउंडेशन यांच्या मदतीने महाराष्ट्रात गिधाड संवर्धन केंद्रे स्थापन करण्याची राज्य सरकारची योजना आहे. ही केंद्रे भारतातील पांढऱ्या रंगाच्या गिधाडांचे जतन करण्यास मदत करतील.

भारतात गिधाडे खूप होती, पण अलीकडे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. काही लोकांना असे वाटते की याचा अर्थ कदाचित भारतातील गिधाडे नामशेष होऊ शकतात.

भारतात पाळीव प्राणी भरपूर आहेत, त्यामुळे अन्न नेहमीच उपलब्ध असते. पण जनावरांना दिलेल्या  औषधांमुळे   गिधाडांची संख्या कमी झाली आहे. पाळीव प्राण्यांना “डायक्लोफेनाक” नावाचे औषध दिले जाते, ज्याचा अंश जनावरांच्या शरीरात राहतो पण नंतर जनावर मेल्यानंतर ते गिधाडांनी खाल्यानंतर  ते विविध आजारांनी त्यांचा मृत्यु होऊ लागले.

गिधाडे ही दिसायला  फार सुंदर नसतात आणि ते मृत प्राण्यांच्या शरीरावर मास खाऊन जगतात  त्यामुळे लोकांना  त्यांच्याबद्दल नैसर्गिक तिरस्कार वाटतो.

गिधाडे ही पर्यावरण अन्नसाखळीचा महत्वपूर्ण भाग असल्याने त्यांचे जतन  , संवर्धन होणे गरजेचे आहे.


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top