मिरची लागवड माहिती Mirchi lagvad mahiti in Marathi

Spread the love

Mirachi lagvad mahiti in Marathi

मिरचीचे  पीक हे योग्य जे पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत घेणे फायद्याचे आहे.

हिरव्या मिरच्यांसाठी, ज्वाला, लाल मिरचीसाठी, C. A. 960, Pant C-1, G-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती,

उन्हाळ्यात एन.पी -46 आणि  ज्वाला ही वाणे निवडून लागवडसाठी निवडु शकता. रोपवाटिकेत रोपे लावल्यानंतर ४५ दिवसांनी रोपांची पुनर्लागवड करावी.

मिरची पिकाची खरिपाची लागवड साधारणपणे जून-जुलैमध्ये केली जाते,  तर उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारीमध्ये केली जाते. रासायनिक खतांचे वापर  माती परीक्षणाच्या आधारे करावे.

जिरायती पिकाची लागवड करताना अंतर हे 60 Cm X 45 Cm ठेवावे आणि

ओलिताखालील पिकाची लागवड करताना अंतर हे 60 Cm X 60 Cm ठेवावे.

मिरची लागवड Mirachi lagvad mahiti in Marathi
मिरची लागवड – हिरवी मिरची

Mirachi lagvad mahiti in Marathi

प्रस्तावना:

मिरची हा भारतीय आहारातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे, शिवाय  वर्षभर मिरचीला कायमच मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. याशिवाय परदेशातून भारतीय मिरचीला मागणी आहे.

हिरवी मिरची हि  उष्णकटिबंधीय प्रदेशात घेतले जाणारे पीक आहे, आणि तिचे मूळ उत्पादन ठिकाण भारत आहे. हिरवी मिरची ताजी  किंवा वाळलेली  खाल्ली जाते.  मिरची चा वापर मसाल्यांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात केला जातो.

महाराष्‍ट्र राज्यात  मिरची ह्या पिकाची  लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍ट.  क्षेत्रावर होते. एकूण 68 टक्‍के महाराष्‍ट्रातील मिरचीखालील  क्षेत्रापैकी जळगांव, नागपूर,धुळे,कोल्‍हापूर अमरावती सोलापूर चंद्रपूर धाराशिव,नांदेड या जिल्‍हयात आहे.

मिरची मसालेदार चवी सोबत, अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.  इतर जीवनसत्त्वे आणि खनिजांसह व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमचे चांगले स्त्रोत आहेत.

हिरवी मिर्ची हा भारतीय मसाल्यांचा मुख्य घटक आहे, त्याचा वापर भाज्या, कडधान्ये, डाळी  आणि भात  यांना बनवण्यासाठी केला जातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते चवीला तिखट आहे आणि ते उत्तेजक अन्न म्हणूनही ओळखले जाते.

मिरची हे एक मसाला पीक आहे, जे तिखटपणा आणि चवीसाठी ओळखले जाते. मिरचीचा वापर औषधी मध्ये  देखील केला जातो आणि विविध प्रकारचे गुणधर्म सुध्दा आहेत.

Mirachi Lagvad mahiti in Marathi

हवामान:

मिरचीच्या पिकांसाठी उष्ण आणि दमट हवामान चांगले असते. तिन्ही हंगामात मिरचीची पिके घेतली जाऊ शकतात.

मिरचीची झाडांना 40 इंचापेक्षा कमी पाऊस मानवतो. 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात मिरचीची झाडे आणि फळे चांगले होतात. आणि उत्पादनाही वाढ होते.

जर पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला आणि ढगाळ वातावरण असेल तर फुल गळ होते.

जमीन:

सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास हलक्या जमिनीत सुध्दा मिरचीचे पीक चांगले होईल.

मिरचीचे पिक हे  पाण्‍याचा चांगला निचरा होत नसलेल्या जमिनीत घेऊ नये.

मिरचीसाठी मध्‍यम काळी स्वरूपाची आणि उत्‍तम पाण्‍याचा निचरा होणारी जमिन बागायती किंवा पावसाळी मिरचीसाठी  वापरावी.

हंगाम:

मिरची पिक हे दोनही  हंगामात घेतले जाऊ शकते.

पावसाळी:

मिरची पिकाची लागवड जून किंवा जूलै महिन्‍यात करावी.

उन्‍हाळी :

जानेवारी किंवा फेब्रूवारी महिन्‍यात मिरची पिकाची लागवड करावी.

हिरव्‍या मिरचीची  बाजारात कायम वर्षभर मागणी असते. लागवडीसाठी सुधारित वाणाची निवड करू शकता.

वाण:

पुसा ज्‍वाला: हे वाण बुटके राहते व फांद्याही खूप असतात.वजनदार आणि तिखट फळे असतात.

पंत C-1 :

हिरव्या व लाल वाळलेल्या मिरचीसाठी हे उत्तम वाण आहे. ह्या वाणाला फळे उलटे येतात.

पिकल्‍यानंतर मिरचीला  लाल रंग येतो. मिरचीची लांबी ही 8-10 cm असते, आणि साल ही जाड असते. मिरचीला बिया खूप अधिक असतात.

संकेश्‍वरी 32 :

हे वाण उंच वाढते, आणि मिरची सुमारे 20 ते 25 cm इतकी  लांब असते. आणि साल  पातळ असते.  सालीवर सुरकुत्या पडतात आणि वाळलेल्या मिरच्यांचा रंग गडद लाल असतो.

G-2, G-3, G-4, G-5:

या सर्व जास्त उत्पादन देणाऱ्या मिरचीच्या जाती आहे, लांबी ला कमी असतात, मिरचीची लांबी जवळपास 5 ते 8 Cm  इतकी असते रंग. गडद तांबडा असतो.

मुसाळवाडी

खरीप हंगामात वापरण्यास योग्य वाण आहे, झाडे उंच वाढतात. बोकड्या , भुरी, डायबॅक इत्यादी रोगास बळी पडण्याचे प्रमाण कमी आहे.  

पुसा सदाबहार:

ह्या जातीची झाडे उंच वाढतात, पाने रुंद असतात. पिकलेली मिर्ची चमकदार लाल रंगाची दिसते.

उत्पादन हिरवी मिरचीचे सरासरी 7.5 ते 10 टन मिळते, तर वाळलेल्या लाल मिरची चे 1.5 ते 2 टन उत्पादन मिळू शकते.

मिरची लागवड  mirachi lagvad mahiti in Marathi
मिरची लागवड – लाल मिरची

मिरची लागवड Mirachi lagvad mahiti in Marathi

काढणी व उत्‍पादन:

साधारणपणे 2.5 महिन्‍यांनी  हिरव्‍या मिरचीची काढणी  सुरु होते.

पुर्ण वाढ झालेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍याफळांची  तोडणी देठासहीत  दहा  दिवसांच्‍या अंतराळणे  करावी.

हिरव्‍या मिरची तोडणी सुरु झाल्‍यानंतर साधारण  3 महिने खुडे सुरू राहातात.  8 ते 10 वेळा खुडे सहज होतात. वाळलेल्या मिरचीची तोडणी पिकून  पूर्ण लाल झाल्यानंतरच करावी.


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top